वनोजा येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:48 IST2021-08-18T04:48:51+5:302021-08-18T04:48:51+5:30

ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणातील विजय स्तंभावरील ध्वजारोहण सरपंच डाॅ. श्रीराम मुखमाले यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणात डाॅ. ...

Flag hoisting at various places in Vanoja | वनोजा येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण उत्साहात

वनोजा येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण उत्साहात

ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणातील विजय स्तंभावरील ध्वजारोहण सरपंच डाॅ. श्रीराम मुखमाले यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणात डाॅ. भालचंद्र राऊत यांनी ध्वजारोहण केले. श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात प्रांगणातील संस्थाध्यक्ष कमलाबाई राऊत यांनी ध्वजारोहण केले. श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातील ध्वजारोहण मुख्याध्यापिका कासलीकर यांनी केले. जि.प. प्राथमिक मराठी केंद्रीय शाळेच्या प्रांगणातील ध्वजारोहण केंद्रप्रमुख दादाराव गवई यांनी केले. प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्रातील ध्वजारोहण अविनाश राऊत यांनी केले. सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणातील ध्वजारोहण सभापती अविनाश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. पशुवैद्यकीय केंद्रातील ध्वजारोहण ज्ञानदेवराव राऊत यांनी केले. कार्यक्रमाला उपसरपंच व सदस्यगण तसेच ग्राविअ पंडित राठोड व ग्रामपंचायत कर्मचारीवृंद त्याचबरोबर सा.रा. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे, प्राध्यापकवृंद, विद्यार्थी, एनसीसी पथक, श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद, बँकेचे शाखाधिकारी राठोड, रोखपाल चौरे व शिपाई भगत, तलाठी पांडे, सेवा सहकारी संस्थेचे सभापती, संचालक, गटसचिव चौधरी, जि.प. प्राथमिक मराठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन राऊत, सदस्यगण, प्रभारी मुख्याध्यापक गजानन वानखडे, पशुवैद्यकीय अधिकारी गोडघासे, आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच गावातील प्रतिष्ठितांची उपस्थिती होती.

Web Title: Flag hoisting at various places in Vanoja