जिल्ह्यात आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:40 IST2021-02-10T04:40:38+5:302021-02-10T04:40:38+5:30

डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला. फेब्रुवारी महिन्यातही रुग्णसंख्येत चढउतार दिसून येत आहेत. मंगळवारी (दि. ९) ...

Five more corona positive in the district | जिल्ह्यात आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला. फेब्रुवारी महिन्यातही रुग्णसंख्येत चढउतार दिसून येत आहेत. मंगळवारी (दि. ९) एकूण पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १, आययूडीपी कॉलनी येथील १, भगवती येथील १, कळंबा महाली येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपकार्तील संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ७,२४७ वर पोहोचला आहे. मंगळवारी २२ जणांना रुग्णालयातून सुटी झाली.

००००००

१०६ जणांवर उपचार

जिल्ह्यात आतापर्यंत ७,२४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,९८५ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाचे स्पष्ट केले.

Web Title: Five more corona positive in the district