पाच घरे आगीत जळून खाक !

By Admin | Updated: April 15, 2017 13:23 IST2017-04-15T13:23:07+5:302017-04-15T13:23:07+5:30

येथून जवळच असलेल्या पांगखेडा या पूनर्वसित गावात शनिवारी सकाळी ९ वाजता अचानक आग लागून ५ घरे जळून खाक झाली.

Five houses burnt to the fire! | पाच घरे आगीत जळून खाक !

पाच घरे आगीत जळून खाक !

शिरपूर ( वाशिम ) - येथून जवळच असलेल्या पांगखेडा या पूनर्वसित गावात शनिवारी सकाळी ९ वाजता अचानक आग लागून ५ घरे जळून खाक झाली . तसेच  ६ गुरांचे गोठे जळाले असून काही जनावरे भाजलीत . आगीचे कारण कळू शकले नाही. शिरपूर पासून जवळच असलेल्या पांगरखेडा गाव पूनर्वसित गाव असून येथे गवळीसमाजाचे नागरिकांचे मोठया प्रमाणात वास्तव्य आहे. शनिवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीमध्ये पाच जणांची घरे जळून खाक झालीत तर काही जणांच्या गोठयामधील जनावरे चांगल्याच भाजली गेली आहे. सहा गुरांचे गोठे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. काही जणांच्या गोठयामधील वैरण जळून खाक झाल्याने त्यांच्यासमोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Five houses burnt to the fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.