पाच वाहनांचा विचित्र अपघात; एक ठार

By Admin | Updated: March 28, 2016 02:26 IST2016-03-28T02:26:20+5:302016-03-28T02:26:20+5:30

नागपूर-औंरगाबाद द्रुतगती मार्गावरील अपघात.

Five car accidents; One killed | पाच वाहनांचा विचित्र अपघात; एक ठार

पाच वाहनांचा विचित्र अपघात; एक ठार

जऊळका रेल्वे: नागपूर येथून येणार्‍या कंटेनरने रस्त्यालगत उभ्या असलेल्या चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले. ही घटना नागपूर-औंरगाबाद द्रुतगती मार्गावरील जऊळका रेल्वे येथील रेल्वे गेटजवळ रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. कंटेनरचा चालक पसार होण्यात यशस्वी झाला.
जऊळका रेल्वे गेट बंद असल्यामुळे एका कंटेनरने उभ्या असलेल्या खुराणाची ट्रॅव्हल व दोन ट्रकला जबर धडक बसल्यामुळे एकमेकांवर आदळून पाचव्या नंबरवर उभा असलेल्या ट्रकचा क्लिनर खाली पडून जागीच ठार झाला. ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना मुका मार बसला असून, टाटा एस वाहनाचा चुराडा झाला. नागपूरकडून येणार्‍या सी.जी.0४ जेए ४४७१ या वाहनाने भर वेगाने येऊन उभ्या असलेल्या टाटा एसला जोरदार धडक दिली. नंतर ते वाहन ट्रॅव्हल क्रमांक एम.एच.0४ एफ. ७९९९ व एम.एच.0४ एफडी ३१६0 व ट्रक क्रमांक एम.एच.0४ सी.यू. ४७५८ या वाहनावर आदळले. एम.एच.0४ सी.यू. ४७५८ या क्रमांकाच्या ट्रकचा क्लिनर सहीम युनुस खॉ (वय ४0 रा. तातो मुरेनी जि. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) हा जागीच ठार झाला तर रमेश दगडूजी पांडे रा. वडप ता. मालेगाव, आनंदा डाके वारंगी, बाळासाहेब विष्णू सोळंके औंरंगाबाद, नागोराव पौळ औरंगाबाद हे चौघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जऊळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून वाशिम व येथून पुढे अकोला येथे हलविण्यात आले. चौघापैकी दोघांचे पाय व एकाचा हात फॅर झाला. रेल्वे गेट बंद असल्यामुळे गाडीतील प्रवाशी खाली उभे असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी जऊळका रेल्वे येथील पोलीस स्टॉप, वाहतूक पोलीस, होमगार्ड यांनी धाव घेतली. या अपघातानंतर एक ते दोन किलोमीटर वाहतूक खोळंबली होती.

Web Title: Five car accidents; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.