शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिला विलगीकरण कक्ष शेलूबाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 11:32 IST

Washim News : जिल्ह्यात शेलूबाजार येथील ग्रामपंचायतने प्रथमच गावस्तरावर विलगीकरण कक्ष स्थापन केला

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार : स्थानिक ग्रामपंचायतने जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात शेलूबाजार येथील ग्रामपंचायतने प्रथमच गावस्तरावर विलगीकरण कक्ष स्थापन केला. या कक्षाचे उद्घाटन २५ मे रोजी उपविभागिय अधिकारी सखाराम मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायतच्यावतीने विलगीकरण कक्ष जिल्ह्यात प्रथमतः निर्माण करण्याचा बहुमान शेलूबाजारला मिळविला. यावेळी तहसीलदार नरसय्या कोडागुरले, गटविकास अधिकारी हरिनारायण परिहार, गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद भगत, डॉ. प्रशांत महाकाळ भगत, जि.प.सदस्य दौलत इंगोले, पांडुरंग कोठाळे, रामराव इंगोले, पं.स. सदस्य सचिन राऊत, गणेश पवार, सरपंच प्रमिला पवार, ग्रामविकास अधिकारी सीमा सुर्वे, ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी मुळे यांनी ग्रामपंचायतीने हा कक्ष उभारल्याने सरपंच, सचिव व ग्रामपंचायतीची प्रशंसा करत फारशी लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णाला या विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. विलगीकरण कक्ष व तिथे राहणाऱ्या रुग्णांसाठी सोयीसुविधांची पाहणी उपविभागीय अधिकारी मुळे यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन पांडुरंग कोठाळे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या