उमेदवारांचा पहिला सामना दुष्काळाशी

By Admin | Updated: August 19, 2014 23:42 IST2014-08-19T23:42:40+5:302014-08-19T23:42:40+5:30

उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पहिली लढत दुष्काळजन्य परिस्थितीशी द्यावी लागत आहे.

The first match of the match is in drought | उमेदवारांचा पहिला सामना दुष्काळाशी

उमेदवारांचा पहिला सामना दुष्काळाशी

वाशिम : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच काही इच्छूक उमेदवारांनी आपल्यालाच पक्षाचे तिकीट मिळणार असून प्रचाराला सुरूवात केली आहे. या इच्छूक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पहिली लढत दुष्काळजन्य परिस्थितीशी द्यावी लागत आहे.सध्या पावसाची परिस्थिती एकदम वाईट असून पिके पाण्याअभावी सुकून जात आहेत. वाशिम जिल्हयातील तीन विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षांचे इच्छूक उमेदवार व काही अपक्ष निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी भेटी गाठी, समारंभ व इतर कार्यक्रमात मतदारांशी चर्चा करणे सुरू केले आहे. पक्ष आपल्यालाच तिकीट देणार असून लक्ष असू द्या असे काही जण सांगत असतांना त्यांना मतदार मात्र भाऊ पाऊस नाही, पिक विम्याचे पैसे नाही, दुष्काळ जाहीर झाला पाहिजे यासह विविध प्रश्न उपस्थित करीत असल्याने इच्छूकांची बोलती बंद होत असल्याचे चित्र तीनही विधानसभा मतदार संघात दिसून येत आहेत.

Web Title: The first match of the match is in drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.