गोठ्याला आग; दीड लाखांचे नुकसान!

By Admin | Updated: May 12, 2017 08:52 IST2017-05-12T08:52:11+5:302017-05-12T08:52:11+5:30

गुराच्या गोठ्यास गुरुवारी दुपारी ४:३० वाजताचे दरम्यान अचानक आग लागली. त्यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Fireplace; Hundreds of losses! | गोठ्याला आग; दीड लाखांचे नुकसान!

गोठ्याला आग; दीड लाखांचे नुकसान!

शेलूबाजार : येथून जवळच असलेल्या ग्राम नागी येथील दामोदर रामचंद्र राऊत यांच्या नागपूर-औरंगाबाद द्रूतगती मार्गावरील शेतात असलेल्या गुराच्या गोठ्यास गुरुवारी दुपारी ४:३० वाजताचे दरम्यान अचानक आग लागली. त्यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, शेतकरी राऊत यांच्या शेतातील गोठ्यास अचानक आग लागून ४० पत्रे, लोखंडी अँगल, ५ ट्रॉली कुटार, पाइप, केबल, तुरीचे कट्टे तसेच बाजूलाच असलेल्या मळ्यातील उसाच्या बागेला आगीची जबर झळ पोहोचली. या घटनेत त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.

Web Title: Fireplace; Hundreds of losses!