येडशी येथे घराला आग; ६० हजाराचे नुकसान

By Admin | Updated: March 17, 2017 19:52 IST2017-03-17T19:52:57+5:302017-03-17T19:52:57+5:30

येडशी येथील घराला दि १६ च्या रात्री १० वाजताचे सुमारास अचानक लागलेल्या आगीत संसार उपयोगी भांडे, कपडे तथा मौल्यवान वस्तु जळून खाक झाली

Fire at Yedashi house; 60 thousand losses | येडशी येथे घराला आग; ६० हजाराचे नुकसान

येडशी येथे घराला आग; ६० हजाराचे नुकसान

शेलूबाजार : नजीकच्या ग्राम येडशी येथील उमेश दिनकर तायडे यांच्या राहत्या घराला दि १६ च्या रात्री १० वाजताचे सुमारास अचानक लागलेल्या आगीत संसार उपयोगी भांडे, कपडे तथा मौल्यवान वस्तु जळून खाक झाली यामध्ये तायडे यांचे ६० हजार रुपयाचे नुकसान झाले
येडशी येथील उमेश तायडे यांच्या राहत्या घराला गुरुवारच्या रात्री अचानक आग लागली उमेश गावातील त्यांच्या बहिनीच्या घरी जेवन करायला गेले होते.आग लागल्याची माहीती त्यांना कळताच उपस्थीत नागरिकाच्या मदतीने आग आटोक्यात आनली परंतु आग विझविण्यापुर्वीच घरातील टिव्ही, कपाट, कुलर,संसार उपयोगी भांडे,कपडे आदी साहीत्य जळून खाक झाली यामध्ये त्यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा
तलाठी नरेंद्र पांडे यांनी करुन तहसिलदार यांचेकडे सादर केला आहे.

Web Title: Fire at Yedashi house; 60 thousand losses