वाशिमच्या शासकीय निवासस्थानांमधील अग्नि अवरोधक यंत्र कालबाह्य!

By Admin | Updated: February 13, 2017 20:03 IST2017-02-13T20:03:38+5:302017-02-13T20:03:55+5:30

आग लागण्याच्या संभाव्य आपत्तीवर वेळीच नियंत्रण मिळविता यावे, यासाठी शासकीय कार्यालयांसह निवासस्थानांमध्ये अग्नी

Fire prevention device in WASHIM Govt. | वाशिमच्या शासकीय निवासस्थानांमधील अग्नि अवरोधक यंत्र कालबाह्य!

वाशिमच्या शासकीय निवासस्थानांमधील अग्नि अवरोधक यंत्र कालबाह्य!

>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 13 - आग लागण्याच्या संभाव्य आपत्तीवर वेळीच नियंत्रण मिळविता यावे, यासाठी शासकीय कार्यालयांसह निवासस्थानांमध्ये अग्नी अवरोधक यंत्र बसविण्यात आले आहेत. मात्र, त्याची तब्बल सन २००७ पासून ‘रिफिलिंग’च झाली नाही. त्यामुळे १० वर्षे मुदतबाह्य ठरलेले हे अग्नी अवरोधक यंत्र केवळ शोभेची वस्तू म्हणून उरले आहेत.  
आवश्यक निधीस मंजूरात आणि इतर प्रक्रिया लालफितशाहीत रेंगाळल्यामुळे गत १० वर्षांपासून शासकीय निवासस्थानांमधील अग्नी अवरोधक यंत्रांची ‘रिफिलिंग’ झालेली नाही. यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांच्याशी संपर्क साधला असता, मार्च २०१७ पूर्वी शासकीय निवासस्थानांमधील अग्नि अवरोधक यंत्रांची ‘रिफिलिंग’ करण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Fire prevention device in WASHIM Govt.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.