शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाघी खुर्द येथे दोन एकरातील तुरीच्या गंजीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 14:50 IST

हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार आरू यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील वाघी खुर्द येथील शिवाजी आरू यांच्या दोन एकरातील तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना ११ फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यान घडली. यामध्ये हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार आरू यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली. सन २०१९ वर्ष शेतकºयांसाठी फारशे समाधानकारक गेले नाही. कधी नैसर्गिक तर कधी मानवी संकटांमुळे शेतकºयांना समाधानकारक उत्पादन घेता आले नाही. खरिप हंगामातील कसर रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकरी परिश्रम घेताना दिसत आहेत. मात्र, काही कुप्रवृत्तीच्या इसमांमुळे शेतकºयांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. मालेगाव तालुक्यातील वाघी खुर्द येथील शिवाजी भागवत आरू यांनी दोन एकरात तुरीची लागवड केली होती. तुरीची सोंगणी करून एका ठिकाणी गंजी लावण्यात आली होती. आरू हे शेगावला गेले होते. ही संधी साधून ११ फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यान किंवा १२ फेब्रुवारीच्या पहाटेदरम्यान अज्ञात इसमाने या गंजीला आग लावली. हा प्रकार १२ फेब्रुवारी रोजी  सकाळच्या सुमारास उघडकीस आला. आगीत तूरीची गंजी जळून खाक झाल्याने हजारो रुपयांची नुकसान झाल्याची तक्रार आरू यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली. याप्रकरणी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :fireआगwashimवाशिमFarmerशेतकरी