शासकीय रुग्णालयांमधील अग्निअवरोधक यंत्र कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST2021-01-13T05:45:51+5:302021-01-13T05:45:51+5:30

भंडारा येथील सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही निष्पाप नवजात बालकांचा करुण अंत झाला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेले ...

Fire extinguishers in government hospitals are out of date | शासकीय रुग्णालयांमधील अग्निअवरोधक यंत्र कालबाह्य

शासकीय रुग्णालयांमधील अग्निअवरोधक यंत्र कालबाह्य

भंडारा येथील सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही निष्पाप नवजात बालकांचा करुण अंत झाला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये आगीपासून बचावासाठी कुठल्या उपाययोजना केल्या जातात, याविषयी जाणून घेतले असता परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १५३ उपकेंद्रांमध्ये आरोग्य विभागाने केवळ ‘फायर एक्सटींग्युशर’ दिलेले आहेत मात्र त्याची रिफीलिंग गेल्या अनेक वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे ते कालबाह्य झाले असून आगीची घटना घडल्यास या यंत्रांचा कुठलाही उपयोग होणार नाही, अशी स्थिती आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

.................

कोट :

जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना अग्निअवरोधक यंत्र पुरविण्यात आले आहेत, मात्र त्याची रिफिलिंग झालेली नाही. याबाबत तत्काळ नियोजन करून प्रश्न निकाली काढला जाईल.

- डॉ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

Web Title: Fire extinguishers in government hospitals are out of date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.