कारंजातील क्लिनिकल लॅबला आग
By Admin | Updated: March 6, 2015 01:56 IST2015-03-06T01:56:50+5:302015-03-06T01:56:50+5:30
९ लाखांचे नुकसान ; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता.

कारंजातील क्लिनिकल लॅबला आग
कारंजा (वाशिम ) : स्थानिक जिजामाता चौकातील अंबा कॉम्प्युटराईज्ड क्लिनिकल लॅबला आज गुरुवार ५ मार्च रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत लॅबमधील ९ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीत ३ लाख ५0 हजार रुपयांचे सेल काऊंटर, १ लाख ५0 हजार रुपयांचे अँनालॉक झर, ३0 हजार रुपयांचा मायक्रोस्कोप, ३५ हजार रुपयांचे कॉम्प्युटर व प्रिंटर्स, १५ हजार रुपयांची १ नग कीन, ५0 हजार रुपयांच्या २ बॅटरीसह इन्व्हर्टर, ३0 हजार रुपयांचे २ नग सेंट्री फ्यूज मशीन, ४0 हजार रुपयांचे केमिकल रिएजंट किट तथा लॅबमधील फर्निचर, कागदपत्ने, फॅन असे मिळून ९ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे लॅबला आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. लॅबचे मालक निखिल पाठक यांच्या माहितीवरून कारंजा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.