शहरातील इमारतींना ‘फायर ऑडिट’ बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST2021-01-17T04:35:10+5:302021-01-17T04:35:10+5:30
भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील अग्निसुरक्षा व्यवस्थेच्या परीक्षणाबाबत स्थानिक प्रशासनाला आदेश दिले असून, त्यासंबंधीचे अहवाल संबंधित ...

शहरातील इमारतींना ‘फायर ऑडिट’ बंधनकारक
भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील अग्निसुरक्षा व्यवस्थेच्या परीक्षणाबाबत स्थानिक प्रशासनाला आदेश दिले असून, त्यासंबंधीचे अहवाल संबंधित विभागाला पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्याच अनुषंगाने रिसोड नगरपरिषद शहरातील इमारतीचे मालक, भोगवटदार, तसेच कार्यालय प्रमुख यांनी आपल्या इमारतीची अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ महाराष्ट्र प्रतिबंधक जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम २००९ राष्ट्रीय बांधकामसंहिता (एन.बि.सी.) २०१६च्या तरतुदीप्रमाणे करून घेणे बंधनकारक आहे. याबाबतचे प्रमाणपत्र रिसोड नगरपरिषद कार्यालयात पंधरा दिवसांच्या आत सादर करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी दिला आहे. इमारत मालक शहरातील अनेक इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यास फारसे प्राधान्य देत नसल्याचे दिसून येत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्दैवी दुर्घटना घडू नये. यासाठी प्रशासन यापुढे कठोर कारवाई करणार असून, या संदर्भात शहरातील सर्व इमारत मालकांना नगर परिषदने नोटीस दिल्या असून, इमारतीचे फायर ऑडिट करून घेण्याकरिता पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या कालावधीत इमारत मालकांनी फायर ऑडिट न केल्यास, पालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा बंद करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी सांगितले.