आग लागून शेतीपयोगी साहित्य जळून खाक!
By Admin | Updated: April 21, 2017 01:08 IST2017-04-21T01:08:08+5:302017-04-21T01:08:08+5:30
वाशिम : वडप (ता. मालेगाव) येथे शेतातील गोठ्याला अचानक आग लागून शेतीपयोगी साहित्यासह रचून ठेवलेले गुरांचे कुटार जळून खाक झाले.

आग लागून शेतीपयोगी साहित्य जळून खाक!
वाशिम : वडप (ता. मालेगाव) येथे शेतातील गोठ्याला अचानक आग लागून शेतीपयोगी साहित्यासह रचून ठेवलेले गुरांचे कुटार जळून खाक झाले. यात दोन शेतकऱ्यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवार, २० एप्रिल रोजी घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, शेतकरी विजय जिजेबा गायकवाड आणि नाना सखाराम गायकवाड यांनी गुरांना लागणाऱ्या कुटाराची तजवीज करून ठेवलेली होती. याशिवाय शेतीपयोगी साहित्य शेतात ठेवलेले होते. गुरुवारी अचानक आग लागून हे सर्व साहित्य आणि कुटार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यादरम्यान वाशिमवरून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दलाचे दिनकर सुरूशे यांच्यासह व्यंकटेश राजूलवार, गजानन सुर्वे यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते.