विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल!

By Admin | Updated: May 30, 2017 01:44 IST2017-05-30T01:44:16+5:302017-05-30T01:44:16+5:30

रिसोड : विवाहितेला रॉकेल टाकून जीवे मारल्याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू, ननंद व सासरा अशा चौघांविरूद्ध २९ मे रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

An FIR has been lodged against the four for the marriage! | विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल!

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल!

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : विवाहितेला रॉकेल टाकून जीवे मारल्याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू, ननंद व सासरा अशा चौघांविरूद्ध २९ मे रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
तालुक्यातील ग्राम बाळखेडा येथील विवाहित महिला रेखा नंदकिशोर भोजे हिने मृत्यूपूर्व जबानीमध्ये सांगितले होते की, २४ मे रोजी घरात असताना पती नंदकिशोर भोजे, सासरी उद्धव भोजे, सासू राधा भोजे आणि ननंद कल्पना उदेकर अशा चौघांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर रॉकेल टाकून आपणास पेटवून दिले. दरम्यान, २९ मे रोजी रेखा भोजे हिचा उपचारादरम्यान औरंगाबाद येथे मृत्यू झाला. याप्रकरणी मृत्यूपूर्व जबानीवरून पोलिसांनी नमूद चारही आरोपींविरूद्ध कलम ३०७, ३४ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र हुंडेकर करीत आहेत.

Web Title: An FIR has been lodged against the four for the marriage!