मास्क न लावणाऱ्यांकडून दीड लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:39 IST2021-03-25T04:39:39+5:302021-03-25T04:39:39+5:30

वाशिम नगर परिषदेतर्फे मास्क न वापरणाऱ्यांविरुध्द धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. मुख्याधिकारी दीपक माेरे यांच्या मार्गदर्शनात कर विभागासह ...

A fine of Rs 1.5 lakh for not wearing a mask | मास्क न लावणाऱ्यांकडून दीड लाखाचा दंड

मास्क न लावणाऱ्यांकडून दीड लाखाचा दंड

वाशिम नगर परिषदेतर्फे मास्क न वापरणाऱ्यांविरुध्द धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. मुख्याधिकारी दीपक माेरे यांच्या मार्गदर्शनात कर विभागासह इतर विभागातील कर्मचारी काेराेनाबाबत जनजागृती, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची माेहीम, शहर निर्जंतुकीकरणासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीव्दारे शहरात काेराेनाबाबत जनजागृतीसह मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. अनेक नागरिक पथकातील कर्मचाऱ्यांसह नाहक वाद घालून दंड भरण्यास नकार देताना दिसून येत आहे. काेराेना संसर्ग पाहता नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून केल्या जात आहे.

नागरिकांनी मास्कचा वापर करावा : नगराध्यक्ष अशाेक हेडा

काेराेना संसर्ग पाहता नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन करावे. आपले, आपल्या कुटुंबीयांचे व शहरवासीयांच्या आराेग्याचा विचार करता सर्वांनी मास्कचा वापर करुन काेराेना संसर्ग हाेण्यापासून बचाव करावा, असे आवाहन नगराध्यक्ष अशाेक हेडा यांनी केले आहे.

मास्क न वापरणाऱ्यांची हयगय नाही : मुख्याधिकारी दीपक माेरे

वाढता काेराेना संसर्ग पाहता प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात मास्क न वापरता फिरणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी घराबाहेर निघताना मास्कचा वापर करावा असे आवाहन मुख्याधिकारी दीपक माेरे यांनी केले आहे.

Web Title: A fine of Rs 1.5 lakh for not wearing a mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.