हमाल-मापारी भवनाच्या इमारतीचा मुहूर्त सापडेना

By Admin | Updated: July 30, 2014 00:18 IST2014-07-30T00:18:44+5:302014-07-30T00:18:44+5:30

दोन वर्षापासून वास्तू उद्घाटनाच्या प्रतिक्षेत; बाजार समिती प्रशासनचे हातावर हात

Finding a Muhurat of the Hamal-Mankhari Bhawan building | हमाल-मापारी भवनाच्या इमारतीचा मुहूर्त सापडेना

हमाल-मापारी भवनाच्या इमारतीचा मुहूर्त सापडेना

रिसोड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात गत दोन वर्षापूर्वी हमाल भवन बांधकण्यात आले. हमाल भवनाच्या उद्घाटनाच्या राजकीय चढाओढी पोटी ही वास्तु गत दोन वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत उभी आहे. एकंदरीत सर्व सुविधा युक्त हमाल मापारी भवन तयार असतांनाही हमाल मापारी बांधवांना त्यांचा उपयोग घेता येत नसल्याने बाजार समितीच्या पदाधिकार्‍यां विषयी त्यांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. पाच वर्षापूर्वी हमाल मापारी मतदार संघातून संचालक पदावर सुभाष केदारे हे विराजमान झाले. हमाल मापारी संघटनेचे प्रतिनिधीत्व करीत असतांना त्यांच्या प्रमुख समस्येची जाण लक्षात घेत हमाल मापारी भवनाच्या मंजुरातीकरिता सर्व पदाधिकार्‍यांत विश्‍वासात घेवून हमाल भवनाच्या जागे करिता व लागणार्‍या निधी करिता मंजुरात घेत सर्व सुविधा युक्त अत्याधुनिक स्वरुपाचे दोन हजार क्वेअर फुट क्षेत्रफळाचे बारा लक्ष रुपये खर्च करुन भव्य हमाल मापारी भवन तयार केले. यामध्ये निवासाकरिता भव्य प्रशस्त हॉल, स्वतंत्र संडास बाथरुम, चोवीस तास मुबलक पाणी मिळण्याकरिता दोन हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, महिलाकरिता स्वतंत्र शौचालय वाहन, सायकल पार्कीग करिता मुबलक प्रमाणात जाता आदी सुविधेसह हे भवन गत दोन वर्षापासून तयार असतांनाही केवळ उद्घाटना विषयी असलेल्या राजकीय चढाओढी पोटी हमाल मापारी बांधवांना वापरता येत नसल्याचे वर्तमान परिस्थिती आहे. आजमितीस हे भवन बंद असल्याकारणाने कपाऊंड वॉलच्या सभोवतालचा परिसर घाणीने माखला आहे. सर्वच नागरिक या ठिकाणी लघु शंकेला जात असल्याने सर्वत्र परिसरात दुर्गंधी सुटली आहे. लाखो रुपये खर्च कररुन उभी केलेल्या इमारतीच्या बाहेर नागरिक घाण करीत असल्याने हमाल मापारी बांधव मध्ये याविषयी असंतोष निर्माण झाला आहे. बाजार समितीत सुज्ञ पदाधिकार्‍यांचा भरणा असतांनाही त्यांच्या ही बाब लक्षात का येत नाही. या विषयी बाजार समिती व पदाधिकारी ठोस पाऊस का उचलत नाही असे नाना विविध प्रश्न हमाल मापार्‍यांसह शेतकरी वर्गांच्या मनात येत आहे. हमाल मापारी बांधवांच्या वापराकरिता तातडीने उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी हमाल मापारी वर्गातून जोर धरत आहे.

Web Title: Finding a Muhurat of the Hamal-Mankhari Bhawan building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.