दापुरीत वित्तीय साक्षरता प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:38 IST2021-02-14T04:38:16+5:302021-02-14T04:38:16+5:30
क्रिसील फाउंडेशनच्या माध्यमातून मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्राकडून आयोजित आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबिरात बचत व गुंतवणूक, विमा, पेन्शन, कर्ज, गो ...

दापुरीत वित्तीय साक्षरता प्रशिक्षण
क्रिसील फाउंडेशनच्या माध्यमातून मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्राकडून आयोजित आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबिरात बचत व गुंतवणूक, विमा, पेन्शन, कर्ज, गो डिजिटल आदी विषयांवर ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे विविध बँकसेवा घेण्यासाठी लोकांच्या मागणीची नोंदणी करण्यात आली. या मागणीनुसार संबंधित बँकेशी समन्वय साधून गावात ‘लिंकेज कॅम्प’ घेण्यात आला. या कॅम्पला मनिवाईजचे तालुका समन्वयक प्रफुल्ल गवई, किशोर चक्रनारायण, स्टेट बँकेचे बॅँक मित्र किशोर देशमुख उपस्थित होते. या कॅम्पचे आयोजन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे सहायक व्यवस्थापक विजय खंडरे, क्रिसील फाउंडेशनचे राज्य समन्वयक तसेच मनिवाईजच्या जिल्हा समन्वयकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासाठी ग्रामीण वित्तीय सल्लागार विनायक सरनाईक व मनिवाईज मित्र गोपाल मापारी यांनी परिश्रम घेतले.