.. अखेर मतांचे विभाजन झालेच
By Admin | Updated: October 20, 2014 01:06 IST2014-10-20T01:02:55+5:302014-10-20T01:06:29+5:30
कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणे व धार्मिक आधार यावर मतांचे विभाजन.

.. अखेर मतांचे विभाजन झालेच
कारंजालाड : कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघात यावेळीदेखील जातीय समीकरणे व धार्मिक आधार यावर मतांचे विभाजन झाले. त्यामुळे फक्त मतदानाचा अनुक्रम बदलला; पण जाती व धर्माला बाजूला सारून भाजपाची मोदी लाट राजेंद्र पाटणी यांना तारून गेली. यावेळी कारंजा मतदारसंघात अमित शहा यांची प्रचारसभा झाली तेव्हा भाजपामध्ये नवचै तन्य निर्माण झाले; पण जेव्हा डॉ.बाळासाहेब आंबेडकरांची प्रचार सभा झाली तेव्हाची उ पस्थिती व गर्दी लोकांना वेगळेच संकेत देऊन गेली. विदर्भ कॅन्सर रिलीफच्या परिसरात प्र थम राष्ट्रवादीची प्रचार सभा झाली तेव्हाची गर्दी लक्षवेधी होती; पण त्याहीपेक्षा भारिप- बमसंची सभा अभूतपूर्व ठरली व ती मतदारांना भविष्याची चाहूल देणारी ठरली. त्याच प्रांगणात शिवसेना व बसपाच्या प्रचारसभा झाल्या. भारिपच्या उमेदवारास एकदम दुसर्या क्रमांकावर नेऊन ठेवले तर मनसेचे रणजीत जाधव यांच्या मागे बंजारा समाज एकजूट झाला. त्यामुळे पराभूत होऊनही मतांचा कौल आश्चर्यचकित करणारा ठरला. एखादा समाज पराभव समोर असतानाही आपल्या समाजाच्या उमेदवाराशी एकनिष्ठ राहिलेत, हा अनुभवही नसे थोडका. या दोन उमेदवाराचा मताचा वाढता टक्का विचारात घेता, मतदारांनी आकस्मिक आपला कौल बदलला व ते भाजपाच्या तंबूत जाऊन उभे राहिले. राजेंद्र पाटणी मूळचे शिवसेनेचे; पण त्यांनी भाजपात प्रवेश केला. कार्यकर्त्यांंच्या समुहासोबत राजेंद्र पाटणीकडे जे मतांचे ध्रुवीकरण झाले ते संभाव्य धोका लक्षात घेऊन व जातीय आणि धार्मिक मतांची विभागणी झाली ती एकत्रित शक्ती प्रदर्शनासाठी.