अखेर हैदोस घालणारा माकड जेरबंद
By Admin | Updated: December 9, 2014 23:38 IST2014-12-09T23:38:42+5:302014-12-09T23:38:42+5:30
मंगरूळपीर येथील प्रकार ; ६ जणांना चावा घेतल्यानंतर मिळाले यश.

अखेर हैदोस घालणारा माकड जेरबंद
मंगरुळपीर (वाशिम) : मागील महिनाभरापासुन येडशी गावात हैदोस घालुन ५ नागरिकांसह एका वनविभागाच्या कर्मचार्याला चावा घेवुन गंभीर जखमी करणार्या माकडाला अखेर येडशीचे पोलीस पाटील गणेश बारड यांनी जेरबंद करून गावात निर्माण झालेली दहशत दुर केली त्यामुळे येडशी ग्रामवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
मागील एका महिण्यापासुन येडशी गावात एका माकडाने धुमाकुळ घालुन दहशत निर्माण केली होती तेथील नागरिकासह गावातील कुत्र्यांवर सुध्दा माकडाने हल्ला करून सळो की पळो करून सोडले होते.त्यामुळे गावातील कुत्रे सुध्दा माकडाच्या भितीने दहशतीखाली वावरत होती गावातील शेतकरी शेती कामासाठी बाहेर पडत नव्हते. लहान मुलेही घाबरलेल्या अवस्थेत होती.रात्रीच्या वेळी गावात प्रवेश करून घरात घुसुन नागरिकांना चावा घेवुन जखमी करीत होता.तीन नागरिकासह २ मुले माकडाच्या हल्यात जखमी झाले होते. वनविभागाने त्या माकडाला जेरबंद करण्यासाठी मोहीम अधिक गतीमान केली.परंतु त्याला पकडण्यात अपयश आले .अखेर ६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताचे सुमारास गावातील दिनकर पाटील यांच्या घराच्या खिडकीतुन माकड आत हात टाकुन बसला असता पोलीस पाटील गणेश बारड व अमोल बारड यांनी चपळाई दाखवित माकडाचे हात पाय बांधुन बंदीस्त केले.नंतर वनविभागाच्या कर्मचार्याच्या मदतीने माहुर येथील जंगलात सोडुन देण्यात आले. या कामी डॉ.निलेश बारड,मोहन बारड,अरविंद बारड,यांनी मदत केली असल्याची माहीती पोलीस पाटील बारड यांनी दिली.