अखेर ग्रामीण बँकेची शाखा आॅनलाइन पोर्टलवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 19:39 IST2017-09-04T19:39:13+5:302017-09-04T19:39:58+5:30

इंझोरी: आॅनलाइन अर्ज सादर करण्यासाठीच्या पोर्टलवर कारंजा येथील विदर्भ ग्रामीण कोकण बँकेच्या शाखेचे नाव २ सप्टेंबर रोजी रात्री समाविष्ट करण्यात आले. या संदर्भात लोकमतने २६ आॅगस्टच्या अंकात ‘कर्जमाफीच्या आॅनलाइन पोर्टलवरून बँक गायब’ या मथळ्याखाली, तर १ सप्टेंबरच्या अंकात ’कारंजा शाखेतील कर्जमाफीचे अर्ज वाशिम शाखेच्या नावे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनाने या बँकेचे नाव अखेर आॅनलाइन पोर्टलवर समाविष्ट केले. 

Finally, on Grameen Bank's branch online portal | अखेर ग्रामीण बँकेची शाखा आॅनलाइन पोर्टलवर 

अखेर ग्रामीण बँकेची शाखा आॅनलाइन पोर्टलवर 

ठळक मुद्देशेतक-यांची समस्या निकाली अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी: आॅनलाइन अर्ज सादर करण्यासाठीच्या पोर्टलवर कारंजा येथील विदर्भ ग्रामीण कोकण बँकेच्या शाखेचे नाव २ सप्टेंबर रोजी रात्री समाविष्ट करण्यात आले. या संदर्भात लोकमतने २६ आॅगस्टच्या अंकात ‘कर्जमाफीच्या आॅनलाइन पोर्टलवरून बँक गायब’ या मथळ्याखाली, तर १ सप्टेंबरच्या अंकात ’कारंजा शाखेतील कर्जमाफीचे अर्ज वाशिम शाखेच्या नावे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनाने या बँकेचे नाव अखेर आॅनलाइन पोर्टलवर समाविष्ट केले. 
शासनाने शेतकºयांना दीड लाख रुपर्यांपर्यत सरसकट कर्जमाफी देण्याचे ठरविले. यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज घेण्यासाठी शासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या आपले सरकार आॅनलाईन पोर्टलवर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या कारंजा लाड शाखेचे नावच नसल्याने या शाखेच्या कर्जदार शेतकºयांना अर्ज सादर करणे अशक्य झाले होते. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी कारंजा शाखेच्या बँकेतील कर्जदार शेतकºयांना वाशिम शाखेच्या नावे कर्जमाफीचे अर्ज सादर करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. त्यानंतर अनेक शेतकºयांनी वाशिम शाखेच्या नावे अर्जही सादर केले; परंतु पुढे त्यांचे अर्ज नामंजूर झाल्यास संबंधित सर्व शेतकरºयांना पात्र असतानाही कर्जमाफीपासून वंचित राहावे लागण्याची भितीही होती. या पृष्ठभूमीवर लोकमतने वृत्त प्रकाशित करून बँके सह जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर लगेचच दुसºया दिवशी या बँकेच्या कारंजा शाखेचे नाव कर्जमाफीसाठी अर्ज सादर करावयाच्या आॅनलाइन पोर्टलवर समाविष्ट करण्यात आले. आता २ सप्टेंबर रोजी बँकेने ही दखल घेतली असली तरी, उर्वरित १३ दिवसांत या बँकेतील हजारो कर्जदार शेतकºयांना येत्या १५ सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीचे अर्ज सादर करता येतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

Web Title: Finally, on Grameen Bank's branch online portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.