विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल
By Admin | Updated: January 10, 2017 02:37 IST2017-01-10T02:37:27+5:302017-01-10T02:37:27+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील घटना.

विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल
मंगरुळपीर, दि. ९- तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या सावरगाव येथील २१ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी या घटनेतील आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील २१ वर्षीय महिला आपल्या गावी अाँटोने जात होती.
दरम्यान, आरोपी दीपक भगत याने विनयभंग केला. फिर्यादी महिलेच्या पतीने समजविण्याचा प्रयत्न केला असता शिवीगाळ करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडित महिलेच्या अशा तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
पुढील तपास आसेगाव पोलीस करीत आहेत.