चाेरीप्रकरणी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:29 IST2021-09-02T05:29:57+5:302021-09-02T05:29:57+5:30
डाॅ. हेडा मागील एका महिन्यापासून आपल्या मुलाकडे कुटुंबीयांसमवेत पुणे येथे गेले असल्याने त्यांच्या घरी कोणीच नव्हते. नेमक्या याच बाबीचा ...

चाेरीप्रकरणी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल
डाॅ. हेडा मागील एका महिन्यापासून आपल्या मुलाकडे कुटुंबीयांसमवेत पुणे येथे गेले असल्याने त्यांच्या घरी कोणीच नव्हते. नेमक्या याच बाबीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील १२ हजार रुपये नगदी व १८ हजार किमतीचे चांदीची भांडी अशा एकूण ३० हजारांच्या ऐवजावर हात साफ केला. २७ ऑगस्टला शेजाऱ्यांनी चोरी झाल्याची माहिती डाॅ. हेडा यांना दिल्याने ते २८ ऑगस्ट रात्री ११ वाजता घरी परतले असता घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी २९ ऑगस्टला कारंजा शहर पोलिसात रितसर तक्रार दाखल केली. दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ४५७ व ३८० नुसार गुन्हा दाखल करून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.