वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षावर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:24+5:302021-03-18T04:41:24+5:30
सदर निवेदनात नमूद केले आहे की,उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील शिया वक्फ बोर्डचे माजी अध्यक्ष वसिम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात ...

वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षावर गुन्हा दाखल करा
सदर निवेदनात नमूद केले आहे की,उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील शिया वक्फ बोर्डचे माजी अध्यक्ष वसिम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून इस्लाम धर्माचा सर्वात पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराणमध्ये बदल करून त्यातील एकूण २६ आयात वगळण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. रिजवी यांनी उचललेले पाऊल अत्यंत चुकीचे असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनात नमूद केली आहे. इस्लामिया मदरसाचे अध्यक्ष अब्दुल साजिद अब्दुल समद, शेख महमूद मुबल्लिक दावते इस्लामी, इमाम ओ खतीब गरीब नवाज़ मस्जिदचे नईम खान, इमरान खान मुमताज खान, अमजद खान ठेकेदार, सय्यद नाजिम, मुहम्मद रिजवान, शाहिद खान रूम खान, मुहम्मद रियाज, टीपू सुल्तान आदींनी केली आहे.