क्षुल्लक कारणावरून हाणामारी; एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST2021-03-19T04:41:16+5:302021-03-19T04:41:16+5:30
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गंगू संजय मुठाळ या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तिचा पती संजय मुठाळ ...

क्षुल्लक कारणावरून हाणामारी; एक जण ठार
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गंगू संजय मुठाळ या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तिचा पती संजय मुठाळ याच्या नावे चिवरा गावात दीड एकर कोरडवाहू शेती आहे. आम्ही दोघे पती-पत्नी लोकांच्या शेतात मजुरीची कामे करीत होतो. १७ मार्च रोजी मी उन्हाळी मूग निंदनच्या कामाला शेतात गेलेली होती. तेथून सायंकाळी परत घरी आल्यानंतर पती घरात झोपून असलेले दिसले. टरबूज विकणाऱ्या लोकांसोबत गाडी लावण्यावरून वाद होऊन त्यांनी बाबाला मारहाण केल्याचे मुलगा अंकुश याने सांगितले. माझ्या पतीला चांगलाच जबर मार लागलेला होता. ऑटोमध्ये टाकून त्यांना मालेगावच्या सरकारी दवाखान्यात नेले; मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.