शेतीच्या वादातून हाणामारी; सहा जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:48 IST2021-09-05T04:48:12+5:302021-09-05T04:48:12+5:30
जगन्नाथ रामदास इंगोले यांच्या तक्रारीनुसार, नात्याने भाऊ असलेले रामदास इंगोले, रघुनाथ इंगोले, प्रकाश इंगोले हे शेतीच्या मोजणीकरिता हजर होते. ...

शेतीच्या वादातून हाणामारी; सहा जणांवर गुन्हे
जगन्नाथ रामदास इंगोले यांच्या तक्रारीनुसार, नात्याने भाऊ असलेले रामदास इंगोले, रघुनाथ इंगोले, प्रकाश इंगोले हे शेतीच्या मोजणीकरिता हजर होते. मोजणीदरम्यान निशाणी लावताना आरोपी विठ्ठल इंगोले, हरीश इंगोले, ज्ञानेश्वर इंगोले यांनी संगनमत करून मारहाण केली व राम इंगोले याने रघुनाथ इंगोले याच्या डोक्यावर कुऱ्हाड मारून जखमी केले. या तक्रारीवरून उपरोक्त चार आरोपींविरुद्ध कलम ३०७, ३४ भादंविप्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या गटातील विठ्ठल दयाराम इंगोले यांच्या फ़िर्यादीनुसार, शेतीच्या सरकारी मोजणीदरम्यान आरोपी जगन्नाथ इंगोले, गणेश इंगोले यांनी शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध कलम ३२४, १४३, ५०४ भादंविप्रमाणे गुन्हे दाखल केले.
पाच अरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. रघुनाथ इंगोले गंभीर जखमी असल्याने अकोला येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश कुचेकर, पोलिस उपनिरीक्षक राजेन्द्र नाईक, प्रमोद सोनावणे हे करीत आहेत.