लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : कारंजा नगर परिषदेअंतर्गत येणाºया मुलजी जेठा हायस्कुलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गखोलीत इंग्रजी विषयाची तासिका सुरू असताना दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण होऊन जबर मारहाण झाली. त्यात एक विद्यार्थी बेशुद्ध झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा नगर परिषदेअंतर्गत येणाºया मुलजी जेठा हायस्कुलमध्ये बुधवारी सकाळी इयत्ता दहावीच्या वर्गखोलीत इंग्रजी विषयाची तासिका सुरू होती. याचदरम्यान दोन विद्यार्थ्यांमध्ये अचानक भांडण सुरू झाले. त्यातील एकाने तौफीक हसन पप्पूवाले (वय १६ वर्षे) याचा गळा दाबल्याने तो बेशुद्ध झाला. ही बाब लक्षात येताच शाळेचे मुख्याध्यापक निशांत राव यांनी अन्य शिक्षकांच्या मदतीने तौफीकला तत्काळ उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र संबंधित रुग्णालयात कृत्रीम श्वासोश्वास (आॅक्सीजन) देण्याची व्यवस्था नसल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची वार्ता कळताच शाळेत व ग्रामीण रुग्णालयात मृतक विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी तोबा गर्दी केली. या घटनेतील दोन्ही विद्यार्थी हे एकाच कुटूंबातील असल्याची माहिती असून इंग्रजी विषयाची तासीका सुरू असताना आणि वर्गशिक्षिका हजर असताना यासारखी घटना घडणे हे दुर्दैवी मानले जात आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिस कारवाईची प्रक्रिया सुरू होती.
दहावीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये वर्गातच हाणामारी; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 18:12 IST
दहावीच्या वर्गखोलीत इंग्रजी विषयाची तासिका सुरू असताना दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण होऊन जबर मारहाण झाली.
दहावीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये वर्गातच हाणामारी; एकाचा मृत्यू
ठळक मुद्देइयत्ता दहावीच्या वर्गखोलीत इंग्रजी विषयाची तासिका सुरू होती. एकाने तौफीक हसन पप्पूवाले (वय १६ वर्षे) याचा गळा दाबल्याने तो बेशुद्ध झालाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.