क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी

By Admin | Updated: September 21, 2016 02:17 IST2016-09-21T02:17:55+5:302016-09-21T02:17:55+5:30

मालेगाव तालुक्यातील पांगरी येथील घटना.

Fierce clash in two groups | क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी

क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी

मालेगाव (जि.वाशिम), दि. २0- तालुक्यातील पांगरी कुटे येथील एकाच समाजातील दोन गटात हाणामारी होवून तीन जण जखमी झाले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा घडली.
पांगरी कुटे येथील विजय जनार्धन कुटे यांनी मालेगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की, गुराच्या गोठय़ावरुन वाद होवून आरोपी शेषराव नाथा कुटे, योगेश कुटे व एक महिला यांनी हातात गोटे, काठी घेवून मारहाण केली. तर दुस-या गटाकडून फिर्यादी योगेश शेषराव कुटे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले की, विजय कुटे, सुरज कुटे व एक महिला यांनी हातात गोटे व काठी घेवून घरावर येवून मारहाण केली. यामध्ये डोके फुटल्याने मालेगाव पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. वैद्यकीय अहवालावरुन मालेगाव पोलिसांनी विविध कलमान्वये दोन्ही गटातील एकुण सहा जणांवर गुन्हे दाखल करुन प्रकरण तपासात घेतले.

Web Title: Fierce clash in two groups