उष्माघात जनजागृती चित्ररथाचा २२ ला होणार समारोप!
By Admin | Updated: April 20, 2017 16:00 IST2017-04-20T16:00:54+5:302017-04-20T16:00:54+5:30
१७ एप्रिलपासून संपूर्ण वाशिम जिल्ह्यात चित्ररथाव्दारे जनजागृती केली जात आहे.

उष्माघात जनजागृती चित्ररथाचा २२ ला होणार समारोप!
वाशिम : उष्माघातापासून बचावाबाबत जनजागृती करण्यासाठी १७ एप्रिलपासून संपूर्ण जिल्ह्यात चित्ररथाव्दारे जनजागृती केली जात आहे. या चित्ररथाचा समारोप शनिवार, २२ एप्रिल रोजी होणार आहे. या जनजागरण मोहीमेचे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सुक्ष्म नियोजन करण्यात आले असून मोहीम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करित आहे. यादरम्यान जिल्ह्यातील गावागावांमध्ये जावून उष्माघातापासून उद्भवणारे आजार, शारिरीक व्याधींबाबत अवगत केले जात असून त्यापासून बचावाकरिता असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.