शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

महिला शिक्षिका पोहोचल्या विद्यार्थ्यांच्या दारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 10:11 AM

Washim News सात-आठ विद्यार्थ्यांचे गट पाडून मोकळ्या जागेत या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे.

वाशिम : कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून महिला शिक्षिकादेखील सरसावल्या असून, समुदाय पद्धतीने गावातील मोकळ्या जागेत, समाजमंदिर, सभागृह आदी ठिकाणी समुदाय पद्धतीने शिकविण्यात येत आहे. २०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला, त्यामुळे २३ मार्चपासून शाळा बंद आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पहिली ते आठवीचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७६ प्राथमिक शाळा असून, जवळपास ६३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल, संगणक, टॅब आदी साहित्य उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी ग्रामपंचायत सभागृह, मंदिर, मोकळ्या जागेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने जिल्ह्यात शिक्षिकादेखील समुदाय पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवित असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात प्राथमिक शाळेवर जवळपास ३१३१ शिक्षक कार्यरत आहेत, यामध्ये ७७८ महिला शिक्षिकांचा समावेश आहे. सात-आठ विद्यार्थ्यांचे गट पाडून मोकळ्या जागेत या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळत आहे. विविध उपक्रम राबविणाऱ्या महिला शिक्षिकांचे काैतूक हाेत आहे.

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षण