बंजारा महिला मंडळाचा ओढणी सत्कार
By Admin | Updated: February 27, 2015 00:41 IST2015-02-27T00:41:10+5:302015-02-27T00:41:10+5:30
शिंगणापूर येथील तांड्यात दारूबंदीचा ठराव स्त्युत्य उपक्रम.

बंजारा महिला मंडळाचा ओढणी सत्कार
मानोरा (जि. वाशिम): शिंगणापूर येथील तांडयात दारूबंदीचा ठराव करून समाज हित जोपासण्याचे स्तूत्य कार्य केल्याबद्दल महिला मंडळाच्या सत्काराचे आयोजन मंगळवारी केले होते. यावेळी दारूबंदीसाठी महिला मंडळाचा पुढाकार बंजारा समाजाकरीता दिशादर्शक ठरणारा असल्याचे प्रतिपादन विदर्भातील प्रख्यात मुळव्याध तज्ञ डॉ.सुभाष राठोड यांनी केले. दारू या व्यसनामुळे शिंगणापूर येथील कित्येक महिला विधवा झाल्याबद्दल डॉ. राठोड यांनी हळहळ व्यक्त करून दारूबंदी काळाची गजर असल्याचे त्यांनी सांगितले. बंजारा महिला मंडळानी घेतलेल्या पुढाकाराचे कौतूक करून त्यांनी अभिनंदन केले महिलांच्या या अलौकींक उपक्रमामुळे आपणसुद्धा दारूबंदी साठी प्रेरित झालो असल्याचे सुध्दा डॉ.राठोड यांनी यावेळी सांगितले. लग्न-कार्याप्रसंगी डि.जे. सारख्या भडक वाद्याचा वापर न करण्याचा संकल्प येथील नवयुवकांनी घेतला. दारूबंदी करीता या नवयुवकांनी पुढाकार घेवून तांड्या-तांड्यात जावून समिती स्थापन्याचा निर्णयसुध्दा याप्रसंगी घेतला. महिला मंडळ अध्यक्षा पार्वतीबाई चव्हाणसह एकुण २१ बंजारा महिला मंडळ सदस्याचा ओढणी व श्रीफळ देवून डॉ.राठोड यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.