वडिलाने केला स्वत:च्या मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: July 2, 2016 00:10 IST2016-07-02T00:10:29+5:302016-07-02T00:10:29+5:30

वाशिम जिल्ह्यातील घटना; नराधम वडिलास अटक.

Father raped his own daughter | वडिलाने केला स्वत:च्या मुलीवर बलात्कार

वडिलाने केला स्वत:च्या मुलीवर बलात्कार

शिरपूरजैन (जि. वाशिम): येथून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या ग्राम बेलखेड येथील नराधम वडिलाने स्वत:च्या अल्पवयीन मुलीवरच जबरी बलात्कार केला. घटनेच्या सहा महिन्यानंतर पीडित मुलीने शिरपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने गुरूवारी नराधम वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, २ जुलैपर्यंंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या बेलखेड येथे आई, वडील व आजीसोबत राहणार्‍या एका १७ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीसोबत हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. पीडित मुलीची आई ही डिसेंबर २0१५ मध्ये मामाच्या घरी गेली होती. आई घरी नसल्याने सदर पीडित मुलगी वडील व आजीबरोबर घरामध्ये राहत होती. एके रात्री आजी घराबाहेर तर पीडित मुलगी एकटीच घरामध्ये झोपली होती. यावेळी पीडित मुलीच्या वडिलाने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या घटनेची वाच्यता मुलीने आईजवळ केली. आता पीडित मुलीची अकोला येथे वैद्यकीय तपासणी केली असता ती ५ ते ६ महिन्याची गर्भवती असल्याची माहिती पुढे आली आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी नराधम वडिलाविरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ३७६ (२) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. विद्यमान न्यायालयाने २ जुलैपर्यंंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Father raped his own daughter