मेडशी व गोकसावंगी येथील प्रकल्पाग्रस्तांच्या उपोषणाची सांगता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 20:41 IST2017-11-15T20:38:06+5:302017-11-15T20:41:48+5:30
१३ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या मेडशी व गोकसावंगी येथील प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाची तिस-या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी सहाय्यक निबंधक यांच्या लेखी आश्वासनाने सांगता झाली.

मेडशी व गोकसावंगी येथील प्रकल्पाग्रस्तांच्या उपोषणाची सांगता!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - मत्स्यव्यवसाय संस्थेमध्ये प्रकल्पग्रस्तांना सभासद करुन घेण्याच्या माणगीसाठी १३ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या मेडशी व गोकसावंगी येथील प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाची तिस-या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी सहाय्यक निबंधक यांच्या लेखी आश्वासनाने सांगता झाली. भारिप बहूजन महासंघाचे मालेगाव तालुका अध्यक्ष संदीप सावळे यांच्या हस्ते निंबु शरबत घेवून उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
उर्ध्व मोर्णा प्रकल्प मेडशी येथील भावना मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था व गोकसावंगी येथील गणेश मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेमध्ये भागधारक सभासद करुन घेण्याच्या मागणीसाठी संतोष तायडे, महादेव चतरकर, महादेव तायडे, धन्नु भवानीवाले, प्रकाश तायडे, अविनाश वानखडे, लक्ष्मण वानखडे, दशरथ तायडे, प्रदीप जाधव, संजय राठोड, अनिल तायडे, गजानन वानखडे, संतोष वानखडे, राजु राठोड, मिलींद तायडे, सुनिल तायडे, बालु वानखडे, जावेद भवानीवाले, मोहना भवानीवाले, दशरथ तायडे, शिवराम तायडे, त्र्यंबक वानखडे, उध्दव वानखडे, व्दारकाबाई हुगले, दयाबाई तायडे, कासाबाई चतरकर, लिलाबाई वानखडे आदी प्रकल्पग्रस्त उपोषणास बसले होते. दरम्यान उपोषणाच्या तिसºया दिवशी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था अकोलाचे सहाय्यक निबंधक जी.जी. पवार यांनी उपोषणस्थळी येवून सभासद करुन घेण्याची प्रक्रिया सुरु केल्याचे व त्यावर १७ व १८ नोव्हेंबरला सुनावणी ठेवल्याचे लेखी पत्र उपोषणकर्र्त्यांना दिले. त्यानंतर भारिप-बमसं पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी भारिप-बमसंचे मालेगाव तालुका अध्यक्ष संदीप सावळे, जिल्हा नेते राजु दारोकार, निलेश भोजने, अनंता तायडे आदींची उपस्थिती होती.