८,९६,७२५ मतदारांच्या हाती तीन आमदारांचे भवितव्य

By Admin | Updated: October 7, 2014 01:18 IST2014-10-07T01:18:16+5:302014-10-07T01:18:16+5:30

प्रमुख पक्षांसह वाशिम जिल्हय़ात ५७ उमेदवार रिंगणात.

The fate of the three legislators in the hands of 8,97,725 voters | ८,९६,७२५ मतदारांच्या हाती तीन आमदारांचे भवितव्य

८,९६,७२५ मतदारांच्या हाती तीन आमदारांचे भवितव्य

वाशिम : जिल्ह्यात वाशिम, रिसोड व कारंजा असे तीन विधानसभा मतदारसंघ असून, या तिन्ही म तदारसंघामध्ये सध्या ५७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात लढत देण्यास उतरलेले आहेत. यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकात तिरंगी, जास्तीत जास्त चौरंगी लढती पाहावयास मिळाल्यात. यावेळी मात्र बहुरंगी लढती दिसून येत आहेत. जिल्हय़ातील मतदारांना एकूण ५७ उमेदवारांपैकी तीन उमेदवारांना निवडून द्यावयाचे आहे. ८ लाख ९६ हजार ७२५ मतदारांवर जिह्यातून निवडून येणार्‍या तीन आमदारांचे भवितव्य आहे.
जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी व महायुतीमध्ये घटस्फोट झाल्याने प्रत्येकाने आपला उमेदवार निवडणुकीत उभा केला आहे. यासोबतच इतरही राजकीय पक्षांचे व अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. उमेदवारांची वाढलेली संख्या पाहता यावेळी कोणाला बहुमत मिळेल ते जरी सांगता येत नसले तरी डझनांवर उभ्या असलेल्या उमेदवारांची दारोमदार मतदारांवरच्या मतांवर दिसून येत आहे. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात एकूण ५७ उमेदवार विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उभे आहेत. यामध्ये वाशिम विधानसभा मतदारसंघात २0 उमेदवार, कारंजा विधानसभा मतदारसंघात २१ उमेदवार, तर रिसोड विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांना ८ लाख ९६ हजार ७२५ मतदारांपैकी किती मतदार मतदान करतात, यावर लढतीतील चुरस अवलंबून आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता प्रशासनासह सामाजिक संघटनाही पुढाकार घेताना दिसून येत आहेत. रिसोड विधानसभा मतदारसंघात एकूण २८७७६९, वाशिम विधानसभा मतदारसंघात ३२२९३४ तर कारंजा विधानसभा मतदारसंघात २८६0२२ मतदार आहेत. तसेच रिसोड विधानसभा मतदारसंघात एकूण ३0९ मतदान केंद्रे आहेत. तर वाशिम विधानसभा मतदारसंघात ३३९ व कारंजा विधानसभा मतदारसंघात ३१७ मतदान केंद्रे आहेत.

Web Title: The fate of the three legislators in the hands of 8,97,725 voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.