गत निवडणुकीतील ११ उमेदवार पुन्हा आजमावताहेत नशीब
By Admin | Updated: October 7, 2014 01:19 IST2014-10-07T01:19:57+5:302014-10-07T01:19:57+5:30
वाशिम मतदारसंघातील तीन उमेदवारांचा समावेश.

गत निवडणुकीतील ११ उमेदवार पुन्हा आजमावताहेत नशीब
वाशिम : सन २00९ मध्ये झालेल्या वाशिम व कारंजा विधानसभा निवडणूक व २0१४ मध्ये झालेल्या रिसोड विधानसभा पोटनिवडणुकीत लढत दिलेल्या उमेदवारांमधील ११ उमेदवार येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणार्या निवडणुकीत पुन्हा नशीब आजमावत आहेत. यामध्ये कारंजा विधानसभा मतदारसंघात सहा, रिसोड विधानसभा मतदारसंघात दोन, तर वाशिम मतदारसंघातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात २00९ मध्ये असलेल्या १८ उमेदवारांपैकी सहा उमेदवार याही वेळा निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये प्रकाश उत्तमराव डहाके, राजेंद्र सुखानंद पाटणी, उस्मान पिरू गारवे, सुभाष पंढरीनाथ ठाकरे, रमेश पांडुरंग नाखले व रामकृष्ण सावके यांचा समावेश आहे. प्रकाश डहाके २00९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात होते. यावेळी त्यांना पक्षाने ितकीट न दिल्याने ते अपक्ष निवडणूक लढवित आहेत, तर राजेंद्र पाटणी यांनी गत निवडणुकीत शिवसेनेतर्फे निवडणूक लढविली होती. ते यावेळी भाजपाच्यावतीने निवडणूक रिंगणात आहेत. उस्मान गारवे यांनी गत निवडणूक अपक्ष लढविली होती. ते सध्या बसपाचे उमेदवार आहेत, सुभाष ठाकरे यांनी गत निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविली होती. यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ितकिटावर निवडणूक लढवित आहेत. रमेश नाखले व रामकृष्ण सावके यांनी गत निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविली होती. रिसोड विधानसभा मतदारसंघात यंदाच झालेली पोटनिवडणूक अमित सुभाषराव झनक यांनी गत काँग्रेसच्यावतीने तर विजय जाधव यांनी भाजपाच्यावतीने लढविली होती. २0१४ च्या निवडणुकीतही ते त्याच पक्षातर्फे निवडणूक रिंगणात पुन्हा झुंज देण्यास उतरले आहेत. वाशिम विधानसभा मतदारसंघात गत निवडणुकीत डॉ. अल्का मकासरे, लखन मलिक व महादेव ताटके यांनी निवडणूक लढविली होती. २00९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. अल्का मकासरे काँग्रेसच्या उमेदवार होत्या. यावेळी त्यांना पक्षाने तिकीट न दिल्याने त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. लखन मलिक मागील निवडणुकीप्रमाणेच याही वेळी भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. महादेव ताटके हे गत निवडणुकीप्रमाणेच यावेळीही अ पक्ष उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात आहेत.