शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

वाशिम तालुक्यातील चार गावच्या शिवारातील शेतजमीन पावसाने खरडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 2:26 PM

वाशिम: गतवर्षी जिल्ह्यावर रुसलेल्या पावसाने यंदा मात्र उग्ररूप धारण केले आहे. गत दोन दिवसांत बरसलेल्या पावसाने अनेकांची पेरणी वाहून गेली असताना वाशिम तालुक्यातील दगड उमरा परिसरातील चार गावच्या शेतकऱ्यांची जमीनच पावसाने खरडून गेली आहे

ठळक मुद्दे शुक्रवार २२ जूनच्या रात्रीपासून २३ जूनच्या सकाळपर्यंत जिल्हाभरात धो धो पाऊस कोसळला. या एकाच दिवसांत तब्बल २०५ मि.मी. हून अधिक पावसाची नोंद करण्यात आली.शेलगाव घुगे, बाभुळगाव आणि जांभरूण जहागीर येथील ४० हून अधिक शेतकऱ्यांची शेतजमीनच पावसामुळे खरडली आहे.

वाशिम: गतवर्षी जिल्ह्यावर रुसलेल्या पावसाने यंदा मात्र उग्ररूप धारण केले आहे. गत दोन दिवसांत बरसलेल्या पावसाने अनेकांची पेरणी वाहून गेली असताना वाशिम तालुक्यातील दगड उमरा परिसरातील चार गावच्या शेतकऱ्यांची जमीनच पावसाने खरडून गेली आहे. यामुळे शेतकºयांनी पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाच; परंतु आता जमिनी पेरणी योग्यही राहिल्या नाहीत. त्यामुळे या नुकसानीची महसूल विभागाने पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे. वाशिम जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाऊस पडला. यंदा मात्र जूनच्या २३ तारखेपर्यंतच २५ टक्क्यांच्या जवळपास पाऊस पडला. त्यातही शुक्रवार २२ जूनच्या रात्रीपासून २३ जूनच्या सकाळपर्यंत जिल्हाभरात धो धो पाऊस कोसळला. या एकाच दिवसांत तब्बल २०५ मि.मी. हून अधिक पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक झाले आहे. वाशिम तालुक्यातील दगड उमरासह परिसरातील शेलगाव घुगे, बाभुळगाव आणि जांभरूण जहागीर येथील ४० हून अधिक शेतकऱ्यांची शेतजमीनच पावसामुळे खरडली आहे. या शेतकºयांनी पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च व्यर्थ ठरला आहेच शिवाय ही जमीन आता पेरणीसाठी योग्यही राहिली नाही. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्त पाहणी करून या नुकसानीपोटी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसाग्रस्त शेतकºयांच्यावतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमmonsoon 2018मान्सून 2018