शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:34 IST

आसेगाव परिसरातील बहुतांश शेतकºयांनी पेरणीची जोखीम पत्करली नसली तरी, पेरणीला विलंब होत असल्याने त्यांनाही दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : जिल्ह्यात काही भागांत पहिल्याच पावसानंतर खरीपाच्या पेरणीला शेतकºयांना सुरुवात केली असून, आसेगाव परिसरातही दोन टक्क्यांच्या जवळपास पेरणी उरकली आहे. आता चार दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने पेरणी करणाºया शेतकºयांवर चिंतेचे ढग दाटत आहेत. दरम्यान, आसेगाव परिसरातील बहुतांश शेतकºयांनी पेरणीची जोखीम पत्करली नसली तरी, पेरणीला विलंब होत असल्याने त्यांनाही दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे.  आसेगाव परिसरात शेतकºयांनी खरीपाच्या पेरणीसाठी शेतीची मशागत करून बियाणे, खतांची खरेदी करून ठेवली आहे. त्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस चांगला पाऊस पडला. तथापि, उन्हाळ्यात झालेली जमिनीची धूप या पावसामुळे कमी झाली नाही. अशात खरीपाची पेरणी उलटून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी दमदार पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. तथापि, परिसरातील एक ते दोन टक्के शेतकºयांनी मात्र पेरणीला सुरुवात केली आहे. आसेगाव परिसरात २४ जुनपासून आकाशात ढग दाटून येत असले तरी, पाऊस मात्र पडत नसल्याने पेरणी उरकणारे शेतकरी चिंताग्रस्तही आहेत. आता दोन दिवसांत पाऊस पडल्यास पेरणी करणाºया शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार असून, जमिनीची धूप कमी होण्याची प्रतिक्षा करणाºया शेतकºयांनाही दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे.  अल्पभूधारक करीत आहेत स्वत:च मशागतआसेगाव परिसरात २२ आणि २३ जुन रोजी पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जमिन असलेल्या काही शेतकºयांनी तात्काळ मशागत पूर्ण करून पेरणीही केली; परंतु आता पेरणीची वेळ तोंडावर असून, अल्पभूधारक शेतकºयांकडे यंत्रांवर खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने हे शेतकरी हातचलित अवजाराने शेतात वखरणी करून पेरणीसाठी सºया पाडत असल्याचे चित्र आसेगाव परिसरात पाहायला मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती