शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात खड्डे खोदून पिके वाचविण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 15:33 IST

इंझोरी ( वाशिम ) : मानोरा तालुक्यातील अडाण नदीचे पात्र कोरडे पडल्याने या पात्राजवळ लागवड केलेले टरबूज, खरबुजासह काकडीचे पीक संकटात सापडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी ( वाशिम ) : मानोरा तालुक्यातील अडाण नदीचे पात्र कोरडे पडल्याने या पात्राजवळ लागवड केलेले टरबूज, खरबुजासह काकडीचे पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकरीनदीपात्रात सहा ते आठ फुट खोल खड्डे खोदत त्यातील पाण्याद्वारे पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. मानोरा-कारंजा मार्गावर असलेल्या अडाण नदीच्या पात्रात पुलाखाली दरवर्षी हिवाळ्याच्या मध्यंतरापासून विविध ठिकाणचे शेतकरी टरबूज, खरबुजासह काकडीच्या पिकाची लागवड करतात. यातून त्यांना बºयापैकी उत्पादनही होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रयोग येथे सुरूच आहे. तथापि, गतवर्षापासून या नदीच्या पात्रात केलेली पेरणी शेतकºयांच्या अंगलट येत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात २०१७ च्या पावसाळ्यात अवर्षणामुळे नदीपात्र हिवाळ्यातच कोरडे पडल्याने या पात्रात लागवड केलेली निम्म्याहून अधिक पिके करपल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. आता २०१८ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला. त्यातही अडाण पात्राच्या क्षेत्रातील पावसाची सरासरी चांगली राहिल्याने या नदीवरील अडाण प्रकल्प काठोकाठ भरला आणि पात्रातही दुथडीवर पाणी होते. त्यामुळे यंदा या पात्रातील लागवड शेतकºयांचा फायदा करणार असल्याचे वाटू लागले. तथापि, हिवाळा संपत आला असतानाच या नदीचे पात्र कोरडे पडले. त्यामुळे पिके संकटात सापडली.

आता शेतकरी ही पिके वाचविण्यासाठी नदीपात्रात सहा ते आठ फुट खोल खड्डे खोदून त्यात झिरपणाºया पाण्याच्या आधारे पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रयोग शेतकºयांसाठी फायद्याचाही ठरणार आहे, कारण आवश्यक तेवढेच पाणी पिके शोषतील, तर उर्वरित पाण्यापैकी बहुतांश पाणी पुन्हा नदीपात्रात झिरपणार आहे.

टॅग्स :washimवाशिमriverनदीFarmerशेतकरी