रस्ता अडविल्याने शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 04:04 IST2021-06-12T04:04:53+5:302021-06-12T04:04:53+5:30
मानोरा : देवठाणा ते गव्हा हा जुना वहिवाटीचा पांदण रस्ता संतोष रामचंद्र चव्हाण व दिनेश रामचंद्र चव्हाण यांनी ...

रस्ता अडविल्याने शेतकरी अडचणीत
मानोरा : देवठाणा ते गव्हा हा जुना वहिवाटीचा पांदण रस्ता संतोष रामचंद्र चव्हाण व दिनेश रामचंद्र चव्हाण यांनी अडविला आहे. त्यामुळे या रस्त्यावर येणाऱ्या १५ ते २० शेतकरी यांना आपल्या शेतात जाता येत नाही, परिणामी त्यांची पेरणी संकटात आली आहे. सदर रस्ता मोकळा करुन द्यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
तहसीलदार मानोरा यांना शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार ,अनेक वर्षांपासून हा रस्ता वहिवाटीखाली आहे. याबाबत तत्कालीन नायब तहसीलदार आय. ए. खान यांनी जानेवारी २००५ मधे कायमस्वरूपी रस्ता मोकळा करुन दिला होता. मात्र तरीही गैरअर्जदार यांनी रस्ता अडविला आहे .त्यामुळे आम्ही शेतीमधे पेरणी कशी करावी, माल कसा आणावा? असा सवाल करुन रस्ता मोकळा करुन द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सुमित्रा जनार्धन जाधव, शकुंतला विष्णू जाधव , सविता विष्णू चव्हाण, सुनीता राठोड, कल्पना राठोड,रंजिता राठोड,राजेश भिका राठोड आदी २० शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.