नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:20 IST2017-09-03T19:19:47+5:302017-09-03T19:20:15+5:30
कारंजा लाड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गजानन मुळे (४५) रा. जानोरी या शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.

नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या
ठळक मुद्देजानोरी येथील अल्पभूधारक शेतकरी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गजानन मुळे (४५) रा. जानोरी या शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.
जानोरी येथील अल्पभूधारक शेतकरी यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती होती. यावर्षी ऐन हंगामात पाऊस गायब झाल्याने पिकांची स्थिती नाजूक झाली. एकिकडे पीक हाती येईल की नाही याची खात्री नाही तर दुसरीकडे डोक्यावर कर्जाचा डोंगर या चिंतेतून गजानन मुळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे. बॅकेचे २० हजारावर कर्ज असल्याची माहिती आहे.