दिवाळीच्या दिवशी शेतकरी पुत्राची आत्महत्या

By Admin | Updated: October 31, 2016 20:40 IST2016-10-31T20:40:55+5:302016-10-31T20:40:55+5:30

धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारंजा तालुक्यातील ग्राम वापटी येथील युवा शेतकरी पुत्राने ऐन दिवाळीच्या दिवशी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Farmer's son's suicide on Diwali day | दिवाळीच्या दिवशी शेतकरी पुत्राची आत्महत्या

दिवाळीच्या दिवशी शेतकरी पुत्राची आत्महत्या

>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 31 - धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारंजा तालुक्यातील ग्राम वापटी येथील युवा शेतकरी पुत्राने ऐन दिवाळीच्या दिवशी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  ३० आॅक्टोंबरला दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडली. मुतक  दिगांबर मारोती गोळे हा  २५ वर्षाचा असून व्यवहार व आर्थिक विवचंनेमुळे त्यांने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. 
कामरगाव येथील पोलीसांत मृतकाचे वडील मारोती गोळे यांनी दिलेल्या  फियार्दीत नमुद केली की, त्यांच्या  कुटुंबात  ४ एकर शेती होती . त्यातील २ एकर शेती ही झोडगा सिंचन प्रकल्पात गेली आणि उर्वरीत २ एकर शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उधरनिर्वाह चालत होता. मृतक हा युवा अवस्थेत घरची जबाबदारी स्विकारत असतांना शेतीवर सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज शिवाय मृतकाची बहीण मतिमंद व  लहान भाऊ हा अपंग आहे. तसेच म्हाताºया वडीलाकडे असलेले बँकेचे कर्ज व सततची नापिकी तसेच मृतक घरातील कर्ता पुरुष असल्याने वारंवार त्याच विचारात राहुन आलेल्या नैराश्यातुन त्यांने आपल्या राहत्या घरी दिवाळीच्या दिवशी गळफास घेउन आत्महत्या केली. घरातील कर्त्या पुरुषाने ऐन दिवाळीच्या दिवशी आत्महत्या केल्याने कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीसकरीत आहे.

Web Title: Farmer's son's suicide on Diwali day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.