पीक कर्जासाठी आता शेतक-यांचे मेळावे!

By Admin | Updated: June 9, 2016 02:33 IST2016-06-09T02:33:54+5:302016-06-09T02:33:54+5:30

वाशिम जिल्ह्यातील तहसीलदारांवर जबाबदारी टाकली असून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे.

Farmers rally for crop loan now! | पीक कर्जासाठी आता शेतक-यांचे मेळावे!

पीक कर्जासाठी आता शेतक-यांचे मेळावे!

वाशिम: जिल्ह्यात आतापर्यंत ७८ हजार शेतकर्‍यांना पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे. अद्यापही पीक कर्ज न घेतलेल्या शेतकर्‍यांची गावनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या शेतकर्‍यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तहसीलदाराने बँकांच्या सहकार्याने कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या.
मृग नक्षत्राला सुरुवात झाल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. पेरणीसाठी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांना पीक कर्जाची गरज आहे. १ लाख २१ हजार शेतकर्‍यांना पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत ७८ हजार शेतकर्‍यांना पीक कर्ज वितरण करण्यात आले आहे. पीक कर्जापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने उघडली असून, या मोहिमेचा एक भाग म्हणून प्रत्येक तहसीलदाराने बँकांच्या सहकार्याने कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. तसेच गतवर्षी शेतकर्‍यांनी काढलेल्या पीक विम्याचे पैसे शेतकर्‍यांना मिळणार आहेत. या पैशातून बँक प्रशासनाने थकीत कर्जाची वसुली करू नये, असे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशांप्रमाणे आता पीक कर्जासाठी शेतकर्‍यांचे मेळावे घेऊन अडी-अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत. पीक कर्जासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करणार्‍या शेतकर्‍यांना तातडीने पीक कर्ज मिळण्याच्या दृष्टिकोनातून मेळावे होणार असल्याने याचा शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ऑनलाइन सातबारा मिळविण्यास अडचण आल्यास, पीक कर्जासाठी शेतकर्‍यांना हस्तलिखित सातबारा उतारा देण्याचे निर्देशही दिलेले आहेत. याची अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी या मेळाव्यातून होणार आहे.

Web Title: Farmers rally for crop loan now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.