कालव्याच्या पाण्याने शेतकर्याचे नुकसान
By Admin | Updated: September 7, 2014 22:41 IST2014-09-07T22:41:57+5:302014-09-07T22:41:57+5:30
मालेगाव तालुक्यातील नेतन्सा येथील प्रकार; दोन एकरात दोन लाखाचे नुकसान.

कालव्याच्या पाण्याने शेतकर्याचे नुकसान
मालेगाव : तालुक्यातील नेतंसा येथील गजानन बाजड या शेतकर्याची कालव्यातील पाणी पाझरुन शेतात आल्याने जवळपास दोन एकरातील शेतपिकाचे नुकसान झाल्याचे घटना घडली आहे. या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकरी गजानन लक्ष्मण बाजड यांनी अडोळ लघू प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे नुकसान भरपाई बाबत रितसर तक्रार केली आहे. यांच्या तक्रारीनुसार अडोळ लघू प्रकल्पातुन सिंचनासाठी कालव्याव्दारे पाणी सोडण्यात येते. त्यांचे शेत सर्व्हे. नं. १४0 मध्ये असून अडोळ लघू प्रकल्पाच्या उजव्याकालव्याच्या लेव्हल खाली त्यांचे शेत येत असल्याने पावसाचे पाणी कालव्यातून पाझरुन त्यांच्या शेतात सातत्याने घुसत असते. या संदर्भात वारंवार कार्यालयात माहिती लेखी अर्जाव्दारे देण्यात आली परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्या गेल्याचे बाजड यांचे म्हणने आहे. आता सुरु असलेल्या पावसाचे पाणी कालव्यातून त्यांच्या शेतात घुसल्याने त्यांचे दोन एकरातील पिकाचे नुकसान होवून त्यांना जवळपास दोन लाखाच्या फटका बसल्याचे बाजड यांचे म्हणने आहे. या प्रकरणी नुकसान भरपाईची मागणी बाजड यांनी लघू प्रकल्पाच्या उपविभागीय अधिकार्याडे केली आहे. यासंदर्भात अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मोबाईल आऊट ऑफ कव्हरेज असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
** तक्रारीची दखल नाही
शेतकरी बाज यांनी कालव्यातून पाणी पाझरत असल्याने त्यांच्या कालव्याखालील जमीनीतील पिकाचे नुकासन होत असल्याबाबत लघू पाटबंधारे विभागाला तीन ते चार वेळा लेखी स्वरुपात कळविले. परंतू त्यांच्या कळविण्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे त्यांनी यावेळी लघु पाटबंधारे विभागाला याबाबत कळविण्यासोबतच झालेल्या नुकासानीच्या निवेदनाची प्रतिलीपी जिल्हाधिकार्यांना दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी काय न्याय होतो याकडे लक्ष आहे.