पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची घाई
By Admin | Updated: April 12, 2017 20:55 IST2017-04-12T20:55:11+5:302017-04-12T20:55:11+5:30
वाशिम- खरीप हंगाम तोंडावर असल्याने बँकांनी शेतकºयांना पिक कर्ज वाटप करण्यास प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी कर्जासाठी बँकेकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.

पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची घाई
वाशिम : यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असतांना शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामाला वेग दिला आहे. पेरणीसाठी पैसा हाती असावा यासाठी शेतकरी धडपडत आहेत अशात विविध बँकांनी पिक कर्जाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेकडे धाव घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी ११५० कोटीची उदिष्टे निश्चित करण्यात आले असून त्यासाठी दिड लाख खातेदार शेतकरी पात्र आहेत. राष्ट्रीयकृत बँकासह जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने हे कर्ज वितरण करण्यात आले. येत्या ३१ मे पर्यंत कर्ज वितरणची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पालक मंत्र्यांनी बँकांना दिले आहे. या पुष्ष्ठभूमीव महिनाभराचा कालावधी हाती असतांना १ एप्रिलपासून बँकांनी कर्जवितरणास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसह इतर कामाकरिता वेळ हाती असावा, म्हणून पिक कर्ज काढण्याची घाई कली आहे. जिल्ह्यातील सर्वच बँका पिक कर्जासाठी शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात प्रस्ताव घेत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने केवळ वाशिम तालुक्यात १ एप्रिल ते २० एप्रिल या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये ५८८ खातेदार शेतकऱ्यांना ४ कोटी ८९ लाख ९६ हजार रुपयांचे क र्ज वितरीत केले आहे.याच बँकेच्या मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील छोटयाशा शाखेत १० दिवसात १२९ शेतकऱ्यांनी पिक कर्ज काढले आहे हे येथे उल्लेखनीय आहे.