शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

 शेतरस्त्यासाठी जऊळकाच्या शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 5:02 PM

मालेगाव: शेताच्या वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आल्याने जऊळका रेल्वे परिसरातील अल्पभूधारक शेतकरी अडचणीत आले आहेत. हा रस्ता मोकळा करण्याची मागणी त्यांनी के ली असून, त्याची दखल न घेतल्यास सर्व शेतकरी २ जुलैपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी मालेगावच्या तहसीलदारांना दिला आहे.

ठळक मुद्दे या संदर्भात निवेदन सादर करण्यासाठी शेकडो शेतकरी २२ जून रोजी मालेगाव तहसीलवर धडकले होते. खरीपाचा हंगाम सुरू झाल्यानंतर पेरणीसह इतर कामांसाठी शेतात जावे लागत असताना रस्ता बंद केल्याने शेतकºयांची अडचण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: शेताच्या वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आल्याने जऊळका रेल्वे परिसरातील अल्पभूधारक शेतकरी अडचणीत आले आहेत. हा रस्ता मोकळा करण्याची मागणी त्यांनी के ली असून, त्याची दखल न घेतल्यास सर्व शेतकरी २ जुलैपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी मालेगावच्या तहसीलदारांना दिला आहे. या संदर्भात निवेदन सादर करण्यासाठी शेकडो शेतकरी २२ जून रोजी मालेगाव तहसीलवर धडकले होते. मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील अल्पभूधारक शेतकºयांची शेती परिसरातील पिंपळमाथ्यावर आहे. हे शेतकरी पिढ्यानपिढ्या फकिरमाध्यावरील वहिवाटीच्या रस्त्याने शेतात येजा करतात, तसेच बैलगाडीने शेतमालासह विविध साहित्याच नेआण करीत असतात. मात्र हा रस्ता ज्या शेताजवळून जातो. त्या शेताचे मालक ओमप्रकाश मालपाणी यांनी शेतकºयांना या रस्त्यावरून वहिवाट करण्यास मज्जाव केला आहे. आता  त्यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन शेतीच असून, खरीपाचा हंगाम सुरू झाल्यानंतर पेरणीसह इतर कामांसाठी शेतात जावे लागत असताना रस्ता बंद केल्याने शेतकºयांची अडचण झाली आहे. हा शेतरस्ता वहिवाटीसाठी मोकळा करून देण्याची मागणी शेतकºयांन केली असून, त्याची दखल न घेतल्यास २ जुलैपासून मालेगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा त्यांनी मालेगावचे तहसीलदार राजेश वजिरे यांना २२ जून रोजी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी उकंडा महादू वसू, विश्वनाथ भांदुर्गे, आत्माराम ढवळे, उदेभान नगरे, प्रकाश सावळे, कैलास ढवळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थिती होते. दरम्यान, मालेगावच्या तहसीलदारांनी तातडीने संबंधित तलाठ्यांना बोलावून या शेतकºयांच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या सुचना दिल्या.

 संबंधित वहिवाटीचा रस्ता नकाशावर नसल्याचरी माहिती शेतकºयांना दिली आहे. तथापि, त्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून सामंजस्याने मार्ग काढण्याचे प्रयत्न करण्यात येतील. -राजेश वजिरे, तहसीलदार मालेगाव

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव