उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीवर शेतकऱ्यांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:39 IST2021-02-12T04:39:22+5:302021-02-12T04:39:22+5:30
गतवर्षी जिल्ह्यात दमदार पाऊस पडल्याने जलस्त्रोतांत मुबलक साठा निर्माण झाला आहे. प्रामुख्याने शिवारातील विहिरींची पातळी चांगलीच वाढलेली आहे. ही ...

उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीवर शेतकऱ्यांचा भर
गतवर्षी जिल्ह्यात दमदार पाऊस पडल्याने जलस्त्रोतांत मुबलक साठा निर्माण झाला आहे. प्रामुख्याने शिवारातील विहिरींची पातळी चांगलीच वाढलेली आहे. ही बाब लक्षात घेत कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात ४५०० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीचे नियोजन केले आहे. शेतकºयांनीही रब्बी हंगामासोबतच या पिकाच्या पेरणीवर भर दिला आहे. त्यामुळे ११ फेब्रुवारीपर्यंतच जिल्ह्यात २०४८ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. अद्यापही या पिकाच्या पेरणीसाठी महिनाभराहून अधिक वेळ हाती असल्याने क्षेत्रात वाढ होणार आहे.
-----
गतवर्षी २६९७ हेक्टरवर होती पेरणी
जिल्ह्यात गतवर्षीच्या हंगामात कृषी विभागाने अल्प पावसामुळे कृषी विभागाने कमी क्षेत्रात उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीचे नियोजन केले होते. तथापि, गतवर्षीही शेतकऱ्यांचा या पिकाच्या पेरणीवर भर राहिल्याने तब्बल २६९७ हेक्टर क्षेत्रात या पिकाची पेरणी झाली होती. आता यंदा ११ फेब्रुवारीपर्यंत २०४८ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाल्याने यंदा या पिकाचे क्षेत्र गतवर्षीपेक्षा अधिक राहणार असल्याचे दिसते.
--
मका, ज्वारीकडे शेतकºयांची पाठ
जिल्ह्यात मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकºयांनी उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीवर भर दिला असला तरी उन्हाळी मका आणि उन्हाळी ज्वारी या पिकांच्या पेरणीकडे शेतकºयांनी पाठ केली आहे. कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात ११ फेब्रुवारीपर्यंत उन्हाळी मक्याची केवळ ४२ हेक्टरवर, तर उन्हाळी ज्वारीची केवळ ३१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
---------
उन्हाळी भुईमुगाची तालुकानिहाय पेरणी
तालुका क्षेत्र
वाशिम ६४६
मालेगाव ४५०
रिसोड २००
मं.पीर ५६.
मानोरा ६००
कारंजा ४०