केंद्रावर टोकनसाठी शेतक-यांची झुंबड

By Admin | Updated: May 23, 2017 17:47 IST2017-05-23T17:47:38+5:302017-05-23T17:47:38+5:30

कारंजा केंद्रावर सुमारे दोन हजार शेतक-यांनी टोकन घेण्यासाठी गर्दी केल्याने एकच झुंबड उडाली.

Farmers' flags for token at center | केंद्रावर टोकनसाठी शेतक-यांची झुंबड

केंद्रावर टोकनसाठी शेतक-यांची झुंबड

कारंजा लाड :मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतक-यांना आवाहन केले आणि शेतक-यांनी त्या आवाहनाला प्रतिसाद देत तुरीच्या पेऱ्यात वाढ केल्याने देशासह राज्यात तुरीचे बंपर पिक आले. परिणामी बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत तिप्पटीने भाव पडले. शेतकऱ्यांची व्यथा शासनाने जाणुन घेत आधारभूत किंमतीवर नाफेडची तुर खरेदी सुरु केली, परंतु उदिष्ठापेक्षा जास्त तुर खरेदी झाल्याने या ना त्या कारणाने वेळोवेळी नाफेड खरेदी बंद पडली. शासनाने तुरीच्या शेवटच्या दान्यापर्यंत शासन तुर खरेदी करेल. या वचनाची शेतक-यांची आपल्या आंदोलनातून आठवण करुन दिल्यानंतर कारंजा येथील नाफेड तुर खरेदी केंद्रावर २२ मे पासून टोकन वाटपास सुरुवात करण्यात आली. २२  व २३ मे रोजी पोलिस बंदोबस्तात कारंजा केंद्रावर सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी टोकन घेण्यासाठी गर्दी केल्याने एकच झुंबड उडाली. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने उन्हापासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे या करिता शामीयाना व थंड  पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: Farmers' flags for token at center