पिकांवरील अळ्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतक-यांचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 15:02 IST2017-07-24T15:02:20+5:302017-07-24T15:02:20+5:30
सोयाबीन पिकावर पाने खाणा-या अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने किडींचा प्रार्दुभाव आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी अथक प्रयत्न करत आहेत.

पिकांवरील अळ्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतक-यांचा प्रयत्न
>ऑनलाइन लोकमत
दगडउमरा(वाशिम), 24 - सोयाबीन पिकावर पाने खाणा-या अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने किडींचा प्रार्दुभाव आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी अथक प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरात पिकांवर किटकनाशकांची फवारणी मारण्याच्या कामाला वेग आला आहे.
दगडउमरा परिसरातील शेतांमध्ये सध्या शेतकरी किटकनाशकांची फवारणी करण्यावर जोर देत असून फवारणी करतांना अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत असून पिकांची चाळणी झाली असून अळ्यांनी संपूर्ण पीक कुरतडले आहे.
सोयाबीन पिकावर पाने खाणा-या अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पीके अडचणीत आली आहेत. यामुळे उत्पादनात घट होण्याची मोठी शक्यता असल्याने परिसरातील शेतकरी अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केवळ सोयाबीनच नव्हे, तर मूग, उडिद, तूर आणि कपाशीच्या पिकांवरही या पाने खाणा-या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.