शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

बॅंकांचे उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना मिळेना पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 12:04 IST

Crop Loan : राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण ४० टक्क्यांच्या आत आहे.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात १०२५ कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. दरम्यान, २८ जूनअखेर विदर्भ ग्रामीण कोकण आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून ७० टक्क्यांच्या आसपास पीक कर्ज वाटप झाले; मात्र राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण ४० टक्क्यांच्या आत आहे. या बॅंकांचे उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.जिल्ह्यात ११ राष्ट्रीयीकृत, ४ खासगी आणि दोन सहकारी तत्वावर चालणाऱ्या बॅंकांना १ लाख ४ हजार ७९१ शेतकऱ्यांना १०२५ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक ६०५ कोटींचे उद्दीष्ट जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला असून त्याखालोखाल विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेला ९५ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दीष्ट आहे. या दोन्ही बॅंकांनी शेतकऱ्यांचे हित जोपासत प्रत्येकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक कर्ज वाटप केले; मात्र इंडियन बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, यूको आणि यूनियन या ११ राष्ट्रीयीकृत बॅंकांना देण्यात आलेल्या ३०३ कोटींच्या कर्जवाटप उद्दीष्टापैकी आतापर्यंत केवळ ११० कोटींचे (३६ टक्के) कर्जवाटप केलेले आहे. ॲक्सीस, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि आयडीबीआय या चार खासगी बॅंकांना केवळ २२ कोटींचे कर्जवाटप उद्दीष्ट असताना केवळ ८.९१ कोटींचाच (४० टक्के) वाटप करण्यात आला.या संबंधित बॅंकांचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद दिला जात नसून पीक कर्जापासून वंचित ठेवले जात असल्याचा सूर उमटत आहे. जिल्हाधिकारी, अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकांनी याकडे लक्ष पुरवून शेतकऱ्यांना विनाविलंब कर्जपुरवठा होण्यासंबंधी संबंधित बॅंकांना सक्तीचे निर्देश द्यावे, अशी मागणी होत आहे.

पीककर्ज वाटप बंद असल्याची बतावणीजिल्ह्यातील काही बॅंका पीककर्ज वाटप बंद असल्याची माहिती शेतकऱ्यांच्या देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असा उल्लेख नाबार्डचे शंकर कोकडवार यांनी २५ जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत केला होता. बॅंकांनी चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, अशा सूचना याप्रसंगी कोकडवार यांनी केल्या. यावरून संबंधित बॅंकांनी अंगीकारलेली चुकीची भूमिका यानिमित्ताने उघड झाली आहे.

गत आठवड्यात जिल्ह्यातील सर्व खासगी, राष्ट्रीयीकृत, सहकारी बॅंकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश दिले. पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बॅंकांनी ही बाब गांभीर्याने घेऊन पीककर्ज वाटपास प्राधान्य द्यावे.- शन्मुगराजन एस.जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :Crop Loanपीक कर्जwashimवाशिमFarmerशेतकरी