कोटेशन भरूनही शेतक-यांना कृषीपंप जोडणी मिळेना!

By Admin | Updated: January 12, 2016 02:01 IST2016-01-12T02:01:10+5:302016-01-12T02:01:10+5:30

८८00 कृषीपंप जोडण्या प्रलंबित असल्याने रब्बी सिंचनात व्यत्यय.

Farmers do not get agricultural connections even after filling quote! | कोटेशन भरूनही शेतक-यांना कृषीपंप जोडणी मिळेना!

कोटेशन भरूनही शेतक-यांना कृषीपंप जोडणी मिळेना!

संतोष वानखडे / वाशिम : शेती सिंचनाचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांना महावितरणकडून दिरंगाईचा ह्यशॉकह्ण बसत आहे. कोटेशन भरूनही जिल्ह्यातील आठ हजार ८00 शेतकर्‍यांना अद्याप कृषीपंप जोडणी मिळाली नसल्याने सिंचनापासून वंचित राहावे लागले. शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन बरेच शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. यातूनच शेतात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. विहीर, शेततळे, तलाव, सिंचन प्रकल्प आदींच्या माध्यमातून शेतात पाणी आणण्यासाठी कृषीपंप जोडणी आवश्यक आहे. डिसेंबर २0१५ अखेर जिल्ह्यात ४७ हजार ९९८ कृषीपंप जोडण्या असल्याची नोंद महावितरणच्या वाशिम शाखेच्या दप्तरी आहे. गत पाच वर्षांत १६ हजार ८४३ शेतकर्‍यांनी कृषीपंप जोडणीसाठी आवश्यक त्या शुल्काचा (कोटेशन) भरणा महावितरणकडे केला. यापैकी आठ हजार ७६ कृषीपंप जोडण्या दिल्या असून, उर्वरित आठ हजार ८00 जोडण्या प्रलंबित आहेत. पाणी असूनही केवळ वीजजोडणी नसल्याने शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न भंग पावत आहे. २0१५ मध्ये पोळा सणाच्या पूर्वसंध्येला जऊळका येथील दत्ता लांडगे या शेतकर्‍याने शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाची चिरफाड करून मृत्यूला कवटाळले होते. कृषीपंप जोडणीस विलंब होत असल्याचा मुद्दा दत्ताने निदर्शनात आणून दिला होता. शेतकरी आत्महत्येनंतरही प्रलंबित असलेल्या कृषीपंप जोडणीचा प्रश्न लालफितशाहीतच अडकून असल्याचे दिसून येते. ८८00 कृषीपंप जोडण्या प्रलंबित असल्याने या शेतकर्‍यांना सिंचन करणे अशक्य झाले.

Web Title: Farmers do not get agricultural connections even after filling quote!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.